TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चेंबूरच्या प्रसिद्ध ‘अशफाक बेकरी’वर FDAचा बडगा; FSSAI परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव

156 पैकी अवघे 56 गुण; अस्वच्छता, अयोग्य साठवणूक आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य नोंदींचा अभाव, तपासणीत गंभीर त्रुटी उघड

मुंबई : मुंबईतील खाद्यपदार्थ विक्रेते आणि बेकरी चालकांकडून अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जात आहे की नाही, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) तपासणी मोहीम सुरू आहे. या कारवाईदरम्यान चेंबूर येथील ‘अशफाक बेकरी’वर गंभीर अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी FSSAI परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

चेंबूरमधील सम्राट अशोक नगर, आर. सी. मार्ग परिसरातील अशफाक बेकरीची अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान बेकरीमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.

156 पैकी फक्त 56 गुण

FDAच्या तपासणी अहवालानुसार (अहवाल क्र. 1292645), बेकरीला एकूण 156 पैकी केवळ 56 गुण, म्हणजेच सुमारे 36 टक्के गुण मिळाले. तपासणीचा अंतिम निष्कर्ष ‘नॉन-कमप्लायन्स’ असा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा –  राम मंदिराला मिळाले पहिले CEO; एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

अस्वच्छता आणि अन्न साठवणुकीत गंभीर त्रुटी

तपासणीमध्ये अन्नपदार्थांची अयोग्य पद्धतीने साठवणूक, कीटक नियंत्रणासाठी पुरेशा उपाययोजनांचा अभाव आणि अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थांचे पॅकिंग होत असल्याचे आढळले. तसेच अन्नपदार्थांच्या तापमान नियंत्रणातही गंभीर त्रुटी आढळल्या.

जुना आणि नवीन माल वापरण्यासाठी आवश्यक FIFO/FEFO पद्धतीचा अपुरा वापर होत असल्याचेही तपासणीत समोर आले. याशिवाय खाद्यपदार्थांमध्ये संसर्ग किंवा Cross-Contamination होऊ नये, यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

कर्मचाऱ्यांच्या आरोग्य नोंदींचाही अभाव

बेकरीतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबतही आवश्यक नियमांचे पालन होत नसल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक Protective Gear, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे आणि Food Safety Training यासंदर्भातील नोंदी सादर करण्यात आल्या नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

FSSAI परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव

या सर्व त्रुटींच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, असे लक्षात घेऊन FDAने अशफाक बेकरीचा FSSAI परवाना क्रमांक 11522007000345 निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. बेकरीकडून सर्व त्रुटींची पूर्तता करून अन्न सुरक्षा नियमांचे योग्य पालन केले जात नाही तोपर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button