ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

दिव्या घोडेकरला ४० व्या महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक

चिंचवड | रत्नागिरीतील देवंगण येथे आयोजित ४० व्या महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चिंचवड येथील प्रतिभा ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी कु. दिव्या घोडेकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. या यशाच्या जोरावर तिची आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत दिव्याने १८ वर्षांखालील मुलींच्या १००० मीटर धावण्याच्या शर्यतीत अवघ्या ३ मिनिटे ०६.१६ सेकंदात हे अंतर पार करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

हेही वाचा

पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये लेझर लाईट्सच्या वापरावर बंदी

राज्य पातळीवरील या सुवर्ण यशाच्या बळावर दिव्याची २७ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी (National Games) निवड झाली आहे. दिव्या सध्या प्रतिभा ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी (वाणिज्य शाखा) चे शिक्षण घेत असून, तिने मिळवलेल्या या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

तिच्या या यशाबद्दल कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. शबाना शेख आणि क्रीडा संचालक डॉ. अभय पोतदार यांच्यासह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group