Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये लेझर लाईट्सच्या वापरावर बंदी

नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कायदेशीर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

पुणे | सार्वजनिक गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुका शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, तसेच नागरिकांचे आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे जिल्ह्यात लेझर लाईट्सच्या वापरावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईट्स वापरण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकृत आदेशाद्वारे बंदी घातली आहे.

डोळ्यांना आणि आरोग्याला होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या आदेशाचा भंग करून विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट्सचा वापर करताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्ती, मंडळ किंवा संस्थेविरोधात कठोर पावले उचलली जातील. अशांवर भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम २२३ आणि इतर प्रचलित कायद्यांनुसार कायदेशीर गुन्हा दाखल करून दंडात्मक व शिक्षेची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button