Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची मोठी भरारी; १२,९४४ कोटींचे सामंजस्य करार

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत २३२ उद्योगांचा सहभाग; २१ हजार ३०६ रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२६ मध्ये तब्बल १२ हजार ९४४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे २३२ सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीतून सुमारे २१ हजार ३०६ रोजगारांच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राने दिली.

हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आयोजित या परिषदेला सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट अध्यक्षस्थानी होते. यावेळी इमाव, बहुजन कल्याण, नवीनीकरण ऊर्जा मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., विभागीय सह आयुक्त (उद्योग) स्वप्नील राठोड, जिल्हा उद्योग केंद्राच्या उपायुक्त करुणा खरात, मैत्रीच्या समन्वयक धनश्री जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.

‘उद्योजकांच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल’

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्ह्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. लहान पुरवठादार, उद्योजक आणि मोठे उद्योग यांच्यातील साखळी अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

‘उद्योजकांना जिद्दीने झेप घ्यायची असते; त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल,’ असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला. औद्योगिक वसाहतींमध्ये जागेची मागणी वाढत असून, आज सामंजस्य करार केलेल्या उद्योगांना जागा उपलब्ध करून देताना प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

हेही वाचा –  डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांच्या वैद्यकीय योगदानाचा गौरव; आत्मचरित्राचे प्रकाशन

‘इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीचे हब बनवू’

मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्योगांसाठी अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले. वाढती गुंतवणूक लक्षात घेता दळणवळण, वीजपुरवठा आणि समन्वय केंद्र यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

भविष्यात छत्रपती संभाजीनगरची ओळख इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीचे जागतिक हब म्हणून निर्माण करण्याचा विश्वास सावे यांनी व्यक्त केला. उद्योग करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

औद्योगिक विस्तारासाठी भूसंपादनाला गती

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी उद्योगांच्या वाढीसाठी शासनाच्या धोरणानुसार प्रशासन तत्परतेने काम करत असल्याचे सांगितले. औद्योगिक विस्तारासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया विविध टप्प्यांवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुंतवणूकदार आणि उद्योजकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध झाले असून, मोठ्या प्रमाणात झालेल्या सामंजस्य करारांमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button