Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काठमांडूत अडकलेल्या महाराष्ट्रातील १०६ प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू; चार मिनी बसची व्यवस्था

मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे काठमांडू ते जनकपूर प्रवासाचा मार्ग मोकळा; जनकपूरहून भारत-नेपाळ सीमा आणि पुढे दानापूरमार्गे महाराष्ट्रात परतणार

मुंबई : नेपाळमधील काठमांडू येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १०६ प्रवाशांचा सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे काठमांडूहून जनकपूरपर्यंत प्रवासासाठी चार मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेने रवाना झाले असून, तेथून भारत-नेपाळ सीमेवर पोहोचल्यानंतर बिहारमधील दानापूरपर्यंत बसने जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या प्रवाशांना २८ ऑगस्ट रोजी बिहारमधील दानापूर येथून संघमित्रा एक्सप्रेसने महाराष्ट्रात परतण्याचे नियोजन होते. मात्र, नेपाळमधील सद्यस्थितीमुळे काठमांडूहून मोठ्या बसने पुढील प्रवास करणे शक्य नसल्याने प्रवाशांना वेळेत दानापूरला पोहोचण्यास अडचण निर्माण झाली होती.

मुख्यमंत्र्यांनी घेतली प्रवाशांशी थेट संपर्क साधून माहिती

प्रवाशांची अडचण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रवासी योगेश गावंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नेपाळमधील स्थानिक प्रशासन तसेच नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्याशी समन्वय साधण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानंतर खासदार संदीप राणा यांनी काठमांडूहून जनकपूरपर्यंत जाण्यासाठी चार मिनी बसची व्यवस्था केली. त्यामुळे १०६ प्रवाशांच्या परतीच्या प्रवासाचा मार्ग सुकर झाला आहे.

हेही वाचा –  शिक्षक भरतीला मोठी गती; पवित्र पोर्टलवरून १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस

जनकपूरमार्गे भारतात; दानापूरहून रेल्वेने महाराष्ट्रात परतणार

सर्व १०६ प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते उद्या सकाळी जनकपूरमार्गे भारत-नेपाळ सीमेवर पोहोचतील. त्यानंतर त्यांना बिहारमधील दानापूरपर्यंत नेण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

दानापूर येथून संघमित्रा एक्सप्रेसने महाराष्ट्रात परतण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व प्रवासी सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत येईपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या संपर्कात राहून आवश्यक समन्वय साधत आहेत.

प्रवाशांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः संपर्क साधून अडचणी जाणून घेतल्या आणि तातडीने प्रवासाची व्यवस्था केल्याबद्दल योगेश गावंडे आणि त्यांच्या सहप्रवाशांनी कृतज्ञता व्यक्त केली. संकटाच्या काळात शासनाने केलेल्या तातडीच्या मदतीमुळे महाराष्ट्रातील १०६ प्रवाशांना सुरक्षितपणे मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button