ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केशव रामभाऊ कोटक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सायबर क्राईम जनजागृती सत्राचे आयोजन

डोंबिवली: विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राईम, ऑनलाइन फसवणूक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने केशव रामभाऊ कोटक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायबर क्राईम जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.

या सत्राचे आयोजन प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, डोंबिवली येथील विद्यार्थिनी ईश्वरी किजबिले (मीडिया डायरेक्टर) आणि संस्कृती कोरगांवकर (ॲक्टिव्हिटी डायरेक्टर) यांनी केले. या सत्राला माहिती तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोनचा वाढता वापर, GPay आणि FamPay सारख्या डिजिटल पेमेंट ॲप्सचा वापर तसेच Instagram, YouTube आणि ऑनलाइन गेम्सवर घालवला जाणारा वेळ हे सर्वसामान्य झाले आहे. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

ही गरज लक्षात घेऊन “Cyber Shiksha for Cyber Suraksha” या उपक्रमांतर्गत सायबर क्राईम जनजागृती सत्राचे आयोजन ठाणे जिल्हा कृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, डोंबिवली (पूर्व) आणि Quick Heal Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

या सत्राचे मार्गदर्शन ईश्वरी किजबिले आणि संस्कृती कोरगांवकर यांनी केले. विद्यार्थ्यांना सायबर क्राईम म्हणजे काय, सायबर गुन्हे कशा प्रकारे घडतात आणि ऑनलाइन धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच फेक लिंक, फोटो मॉर्फिंग, व्हिडिओ कॉल स्कॅम, OTP फसवणूक आणि व्हायरस यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

हेही वाचा –  मुंढेंच्या FDAचा मुंबईत पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’; चार अन्न आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित

या सत्राच्या यशस्वी आयोजनासाठी केशव रामभाऊ कोटक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता पाखले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांचा सत्रातील सहभाग उत्स्फूर्त राहिला.

हे सत्र अत्यंत संवादात्मक आणि माहितीपूर्ण ठरले. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला, स्वतःचे अनुभव सांगितले तसेच विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत अधिक माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांची उत्सुकता आणि सहभाग विशेष उल्लेखनीय होता.

विद्यालयातील शिक्षकांनीही या सत्राचे कौतुक केले. सध्याच्या डिजिटल वातावरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना देण्यात आलेली माहिती अत्यंत उपयुक्त आणि गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रगती कॉलेज आणि Quick Heal Foundation यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यास मोठी मदत झाली. या अभियानातील ईश्वरी किजबिले आणि संस्कृती कोरगांवकर यांचे योगदान विशेष कौतुकास्पद ठरले.

या उपक्रमाच्या यशामध्ये प्राचार्य डॉ. धनंजय वानखेडे, IT विभागप्रमुख श्रीमती रुपाली पाटील, Quick Heal Foundationच्या अध्यक्षा श्रीमती अनुपमा कटकर, को-डायरेक्टर अजय शिर्के तसेच सक्रिय सदस्य गायत्री केसरकर आणि दिपू सिंग यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शन, समन्वय आणि सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात जनजागृती आणि नवीन शिकण्याच्या संधी निर्माण होण्यास मदत झाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button