Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सुप्रिया सुळेंबाबतच्या OBC प्रमाणपत्राच्या दाव्यावर वडेट्टीवारांचा यू-टर्न; म्हणाले, ‘खेद व्यक्त करतो’

‘ओबीसी प्रमाणपत्राबाबत भूमिका मांडताना सुप्रिया सुळेंचे नाव अनावधानाने आले’; वाद वाढल्यानंतर विजय वडेट्टीवारांचे स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या विधानावरून सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला आहे.

ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना सुप्रिया सुळे यांचे नाव अनावधानाने आले, असे स्पष्टीकरण वडेट्टीवार यांनी दिले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर बोलताना राज्यातील अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला होता. याचवेळी “राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील ओबीसी प्रमाणपत्र काढून ठेवले आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले होते.

वडेट्टीवार यांच्या या दाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. सुप्रिया सुळे यांनी या आरोपाचा स्पष्ट शब्दांत इन्कार करत काँग्रेसने त्यांच्या नावाने केलेल्या दाव्याचा पुरावा सादर करावा, अशी मागणी केली होती.

हेही वाचा –  साखरेचा तुटवडा आणि भाववाढ रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; व्यापाऱ्यांवर स्टॉक लिमिट लागू

वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी “काँग्रेसने माझे ओबीसी प्रमाणपत्र दाखवावे,” असे आव्हान दिले होते. तसेच काँग्रेसकडून दररोज आपल्याला लक्ष्य केले जात असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली होती.

“रोज उठून काँग्रेस अशा प्रकारचे आरोप का करत आहे? याबाबत मला आश्चर्य वाटत आहे,” असे म्हणत सुळे यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रकरणावरून राजकीय वाद वाढल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला. ओबीसी प्रमाणपत्राबाबत भूमिका मांडताना सुप्रिया सुळे यांचे नाव अनावधानाने आले, असे त्यांनी स्पष्ट केले.

वडेट्टीवारांच्या या स्पष्टीकरणामुळे सुप्रिया सुळे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या दाव्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आता काहीसा शांत होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button