TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी FDAचा मोठा पुढाकार; मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता होणार अधिक सुरक्षित

मध्यान्ह भोजनासोबत अंगणवाडी आहार आणि केंद्रीय स्वयंपाकगृहांचाही तपासणीत समावेश; दर महिन्याला तपासणी, अन्नाचे नमुने घेऊन गुणवत्ता पडताळणी

मुंबई : शाळांमधील विद्यार्थ्यांना दिले जाणारे मध्यान्ह भोजन सुरक्षित, दर्जेदार आणि पौष्टिक आहे की नाही, याची तपासणी आता अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) अधिक काटेकोरपणे केली जाणार आहे. शाळांमधील मध्यान्ह भोजनासोबतच अंगणवाडीतील आहार आणि केंद्रीय स्वयंपाकगृहांचाही तपासणीच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे.

राज्याचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईतील सुमारे आठ ते दहा केंद्रीय स्वयंपाकगृहांची तपासणी करण्यात आल्याची माहिती दिली. मुंबईतील प्रेस क्लबमध्ये आयोजित वार्तालापात ते बोलत होते.

मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या केंद्रीय स्वयंपाकगृहांपासून ते विद्यार्थ्यांच्या ताटापर्यंत अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता कायम राहणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वयंपाकगृहांची स्वच्छता, अन्न तयार करण्याची पद्धत, कच्च्या मालाचा दर्जा, साठवणूक आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन यांची तपासणी केली जात आहे.

हेही वाचा –  रिक्षाचालकांच्या प्रश्नावर संजय राऊत आक्रमक; परिवहन मंत्री सरनाईकांना दिला इशारा

शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये वितरित होणाऱ्या आहाराचे नमुने घेऊन त्यांची गुणवत्ता तपासली जात आहे. त्यामुळे केवळ शाळेतील भोजनाची तपासणी न करता संपूर्ण अन्नसाखळीवर FDAचे लक्ष राहणार आहे.

मध्यान्ह भोजनाची तपासणी केवळ तक्रार आल्यानंतर केली जाणार नसून नियमित तपासणी आणि अन्नाचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात संतुलन राखण्यावरही FDAकडून भर देण्यात येत आहे. जास्त चरबी, साखर आणि मीठ असलेले पदार्थ टाळून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील काही अंगणवाडी केंद्रे आणि शाळांमध्ये गेल्या आठवड्यात तपासणी करण्यात आली असून, यावेळी अन्नाची गुणवत्ता आणि संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दर महिन्याला या केंद्रांची तपासणी केली जाणार असून, गरज भासल्यास तपासणीची वारंवारता वाढविण्यात येणार आहे.

यामुळे केंद्रीय स्वयंपाकगृहात अन्न तयार करण्यापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर अन्नसुरक्षेची पडताळणी होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button