ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये ‘‘आमदार आपल्या दारी’’ उपक्रमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा संकल्प!

भाजपाचे आमदार शंकर जगताप यांचा पुढकार

– प्रभाग क्रमांक १६ मध्ये उद्या होणार उपक्रम

पिंपरी-चिंचवड : नागरिकांच्या विविध समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर चंद्रभागा पांडुरंग जगताप यांच्या वतीने ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रावेत येथील समीर लॉन्स, रावेत, पिंपरी-चिंचवड येथे नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे.

हेही वाचा – मराठवाड्याच्या पाण्यासाठी मोठा निर्णय; कृष्णेचे पुराचे पाणी उजनीत आणून धाराशिव-बीडला देणार

या वेळी नागरिकांना शासकीय योजना, शासकीय दाखले, रेशनकार्ड, तसेच जनसामान्यांच्या तक्रारी, महापालिकेशी संबंधित तक्रारी, वीज, पाणी आणि ड्रेनेजच्या समस्या मांडता येणार आहेत. नागरिकांच्या समस्या संबंधित अधिकारी व शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नागरिकांनी आपल्या तक्रारीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ७५७५२९९९९९ असे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“नागरिकांच्या समस्या सोडविणे हीच आमची प्राथमिकता आहे. ‘आमदार आपल्या दारी’च्या माध्यमातून नागरिकांना आपल्या अडचणी थेट मांडता याव्यात आणि त्यावर संबंधित अधिकारी व शासकीय यंत्रणांच्या उपस्थितीत तातडीने मार्ग काढता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शासकीय योजना, दाखले, रेशनकार्ड तसेच महापालिका, वीज, पाणी आणि ड्रेनेजसह नागरिकांच्या विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन सातत्याने प्रयत्न करणार आहे.”

— शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button