TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मराठवाड्याच्या पाण्यासाठी मोठा निर्णय; कृष्णेचे पुराचे पाणी उजनीत आणून धाराशिव-बीडला देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन; मराठवाड्याचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न

मुंबई : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात येणार आहे. कृष्णा नदीच्या पुराचे अतिरिक्त पाणी उजनी धरणात आणून त्याचा उपयोग धाराशिव आणि बीड जिल्ह्यांसाठी करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यंदा मराठवाड्यात दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन पाणी नियोजन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

महाराष्ट्रातील खासदारांसोबत झालेल्या बैठकीत मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर चर्चा झाली. विरोधी पक्षांच्या खासदारांनीही आपल्या मतदारसंघातील विविध अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. बैठकीत सरकारकडून सकारात्मक आश्वासने मिळाल्याचे खासदारांनी सांगितले.

खासदार शाहू छत्रपती यांनी मतदारसंघातील अडचणी आणि भेदभावाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सांगितले. बैठकीबाबत समाधान व्यक्त करताना सरकारने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात अमलात यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अमरावतीतील जाळीत कांड प्रकरण तसेच रुग्णालयांमधील व्हेंटिलेटरच्या समस्येचाही मुद्दा खासदार बळवंत वानखेडे यांनी बैठकीत मांडला. संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  न्यू इंग्लिश मीडियम स्कूल थेरगावच्या ६ खेळाडूंची राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदकांवर मोहर; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

धुळे मतदारसंघातील मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्पातील जमीन अधिग्रहणाच्या अडचणींबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. या प्रश्नावर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती खासदार शोभा बच्छाव यांनी दिली.

दरम्यान, भोर तालुक्यातील भोंगवली येथे प्रस्तावित 765 केव्ही क्षमतेच्या GIS सबस्टेशन आणि विविध गावांतून जाणाऱ्या टॉवर लाईनच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक होणार आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार गटाचे स्थानिक आमदार शंकर मांडेकर आणि भाजपचे माजी आमदार संग्राम थोपटे उपस्थित राहणार आहेत.

भोंगवली सबस्टेशन आणि टॉवर लाईनला विरोध करण्यासाठी भोर-राजगड सबस्टेशन व टॉवर लाईन हटाव संघर्ष समितीने यापूर्वी कापूरहोळ चौकात पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात होणाऱ्या बैठकीकडेही लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button