कोल्हापुरात महसूलमंत्र्यांचा जनसंवाद; हजाराहून अधिक नागरिकांच्या निवेदनांचा स्वीकार
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या समस्या जाणून घेत दिलासा देण्याचे आश्वासन

कोल्हापूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या निवेदनांचा स्वीकार करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात हजाराहून अधिक नागरिकांनी विविध समस्यांसंदर्भात निवेदने सादर केली. बावनकुळे यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारून संबंधित प्रश्नांबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
हेही वाचा – मानवी मनातील ‘कोलाहल’ रंगांमधून साकार; चंद्रगुप्त भालेराव यांच्या चित्रप्रदर्शनाला आशिष शेलारांची भेट
यावेळी आमदार अमल महाडिक, अशोक माने, राहुल आवाडे, शिवाजी पाटील, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, करवीर प्रांत अधिकारी मोसमी चौगुले, डॉ. समीर शिंगटे आदी उपस्थित होते.





