TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवाजी पार्कमधील ‘कॅफे कॅडेल’वर FDAची कारवाई; अन्न परवाना निलंबित

अस्वच्छता, अपुरी स्वच्छता व्यवस्था आणि शाकाहारी-मांसाहारी पदार्थांच्या हाताळणीत त्रुटी; तपासणीनंतर कठोर निर्णय

मुंबई : शिवाजी पार्क परिसरातील प्रसिद्ध कॅफे कॅडेलचा अन्न परवाना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) निलंबित केला आहे. २० ऑगस्ट २०२६ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श. स. पाटील यांनी केलेल्या तपासणीत कॅफेमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्या. या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर कॅफेचा FSSAI परवाना क्रमांक 11524004000070 निलंबित करण्यात आला.

तपासणीदरम्यान कॅफेमध्ये अपुरी व्हेंटिलेशन व्यवस्था, अस्वच्छ व अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अयोग्य फरशी तसेच हात धुण्यासाठी अपुऱ्या सुविधा आढळल्या. स्वच्छता आणि हायजिनच्या आवश्यक बाबींचीही पूर्तता होत नसल्याचे निदर्शनास आले.

याशिवाय शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची योग्य पद्धतीने स्वतंत्र हाताळणी होत नसल्याने परस्पर दूषितीकरणाचा धोका असल्याचे आढळले. उपकरणे आणि कटलरीचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता वेळापत्रक तसेच आवश्यक नोंदी समाधानकारक नसल्याचेही तपासणीत समोर आले. सुरक्षित पाण्याच्या तपासणीसंदर्भातील आवश्यक नोंदीही उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  प्रौढ लसीकरण आणि COPD उपचारासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शक; वैद्यकीय संघटनेतर्फे राज्यपालांना प्रकाशने भेट

दरम्यान, राज्यभर अन्न भेसळ आणि अन्नसुरक्षेविरोधात FDAकडून कारवाई सुरू आहे. अन्नातील भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी म्हटले आहे.

पालघरमध्ये बनावट FDA अधिकाऱ्यांची दादागिरी

दरम्यान, पालघरमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून हॉटेल चालकाला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. कुणाल भोईर आणि जयेश भोईर या दोघांनी आपण FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे माणसे असल्याचे सांगत हॉटेल चालकाकडे दादागिरी केल्याचा आरोप आहे.

दोघांनी पार्सलचे पैसे देण्यास नकार देत हॉटेल चालकाला धमकावल्याचे सांगण्यात येत आहे. ओळखपत्राची मागणी केल्यानंतर दोघांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button