ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे यांना ‘पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर कला गौरव पुरस्कार’ प्रदान

संतसाहित्य, कीर्तन, अध्यात्म आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल; महाराष्ट्रातून एकमेव मानकरी

पिंपरी : वारकरी संप्रदायाचे भूषण, संतपीठाचे संचालक आणि संतसाहित्य, कीर्तन, अध्यात्म तसेच सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आदरणीय ह.भ.प. राजू शिवाजी ढोरे महाराज यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर कला गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित दीक्षांत एवं पुरस्कार प्रदान समारोहात हा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. सच्चिदानंद जोशी उपस्थित होते.
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार हा संपूर्ण भारतामध्ये केवळ दहा जणांना दिला गेला. त्यापैकी महाराष्ट्रामधून केवळ एक पुरस्कार ह.भ.प.श्री राजू महाराज ढोरे,संचालक,संतपीठ यांना प्रदान करण्यात आला.

ह.भ.प. राजू महाराज ढोरे हे संत तुकाराम महाराजांच्या परंपरेशी जोडलेले आध्यात्मिक विचारवंत व कीर्तनकार म्हणून कार्यरत आहेत. कीर्तन, प्रवचन, भजन तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून ते सातत्याने समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. संत साहित्य, संत विचार आणि वारकरी संस्कृतीचा प्रसार करण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.

हेही वाचा –  शिवाजी पार्कमधील ‘कॅफे कॅडेल’वर FDAची कारवाई; अन्न परवाना निलंबित

त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संतपीठ हे संत विचार, कला, शास्त्रीय संगीत, वारकरी परंपरा आणि भारतीय संत संस्कृतीच्या संवर्धनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून कार्यरत आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांसह संत परंपरेचा विचार आणि वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य संतपीठाच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे.

या अविरत संतसेवेची, कलासाधनेची आणि सामाजिक-सांस्कृतिक योगदानाची दखल घेत ह.भ.प. राजू महाराज ढोरे यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव असण्यासोबतच संतपीठ, वारकरी संप्रदाय आणि संत परंपरेच्या सेवेलाही मिळालेला राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मानला जात आहे.

पुरस्कार स्वीकारताना उपस्थित मान्यवरांनी ह.भ.प. राजू महाराज ढोरे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी संतपीठाच्या संचालिका डॉ. स्वाती मुळे, संतपीठाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे यांच्यासह शिक्षक अविनाश भोगील, महेश शेलके, चंद्रकांत गोसावी, विलास कोकाटे, नेहा नाफडे, सुचेता पुजारी, अर्चना देसाई, शोभा जगताप, गौरी हाडके, प्रियांका कोंडेकर, हिरल गोरे, शंभुदेव गायकवाड, संतोष खोटे, चेतन सपकाळ, अखिल पोखरकर तसेच महाराजांचे आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button