ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलिस दलात मोठा फेरबदल; १० पोलिस निरीक्षकांच्या नव्या नियुक्त्या

गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखेसह महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांची जबाबदारी; अधिकाऱ्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून, बदलीवर नव्याने रुजू झालेल्या १० पोलिस निरीक्षकांना विविध ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा तसेच शहरातील महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांची जबाबदारी या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.

शहराचा वाढता विस्तार आणि त्यासोबत वाढणारी गुन्हेगारी, वाहतूक कोंडी तसेच कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने लक्षात घेता या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नव्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून गुन्हेगारीविरोधातील कारवाईला गती देणे, वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यावर भर राहणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा –  शाळांच्या आधुनिकीकरणासाठी एकनाथ शिंदेंचा ‘मिशन मोड’; शिक्षण विभागाला कालबद्ध कृती आराखड्याचे निर्देश

नियुक्त झालेले अधिकारी

अमोल चंद्रकांत गवळी — गुन्हे शाखा

देवेंद्र परशराम चव्हाण — पोलिस आयुक्तांचे वाचक

हेमंत पोपटराव कदम — विशेष शाखा

राजेन्द्र जयवंत निकाळजे — वाहतूक शाखा

सिद्धराम महादेव म्हेत्रे — हिंजवडी पोलिस ठाणे

गीताराम लक्ष्मण शेवाळे — नियंत्रण कक्ष

विजयकुमार गोरख शिंदे — पिंपरी पोलिस ठाणे

प्रशांत ज्ञानोबा आरदवाड — चाकण उत्तर पोलिस ठाणे

सुरेखा शरद घार्गे — गुन्हे शाखा

चंद्रकांत विनायक जाधव — निगडी पोलिस ठाणे

नव्या नियुक्त्यांनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीविरोधातील कारवाई, वाहतूक नियमन आणि पोलिस प्रशासनाच्या कामकाजाला अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button