TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

ड्रग्स प्रकरणात अभिनेता रोहुल्लाह मेहदीला मुंबई विमानतळावर अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई

दिल्लीहून मुंबईत येताच पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अडकला; ड्रग्स नेटवर्कशी संबंध असल्याच्या संशयावरून चौकशी सुरू

मुंबई : ड्रग्स प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या अभिनेता रोहुल्लाह मेहदी याला काशिमीरा पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीहून मुंबईत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर विमानतळावर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.

रोहुल्लाह मेहदी याचा ड्रग्स नेटवर्कशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून ड्रग्स नेटवर्कमधील इतर आरोपी, पुरवठादार तसेच या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवड पोलिस दलात मोठा फेरबदल; १० पोलिस निरीक्षकांच्या नव्या नियुक्त्या

या कारवाईचे नेतृत्व झोन-१ चे अधिकारी राहुल चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, काशिमीरा पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. गेल्या काही महिन्यांत मुंबई आणि नवी मुंबई परिसरात ड्रग्सविरोधात अनेक कारवाया करण्यात आल्या असून, कोकेन आणि एमडीसह विविध अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

रोहुल्लाह मेहदीच्या अटकेमुळे या प्रकरणातील ड्रग्स नेटवर्कचा आणखी विस्तार समोर येतो का, तसेच त्याचे इतर आरोपींशी नेमके कोणते संबंध आहेत, याकडे आता पोलिसांच्या तपासाचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button