Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

बंगालच्या उपसागरात पनामाचे मालवाहू जहाज बुडाले; बेपत्ता २४ खलाशांच्या बचावासाठी भारतीय नौदल मैदानात

Panama Cargo Ship Sinks | ओडिशाच्या किनारपट्टीजवळ बंगालच्या उपसागरात एक मोठी सागरी दुर्घटना घडली आहे. पारादीप बंदरावरून लोखंडी साहित्य घेऊन निघालेले पनामाचा ध्वज असलेले एक मालवाहू जहाज समुद्रात अचानक बुडाले. हे जहाज ओडिशाच्या किनाऱ्यापासून साधारण २४० सागरी मैल (Nautical Miles) अंतरावर असताना शनिवारी ही घटना घडली. जहाजावर २४ खलाशी (Crew Members) उपस्थित होते, ज्यामुळे या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जहाजावरील २४ कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश खलाशी हे चिनी नागरिक आहेत. जहाजाला जलसमाधी मिळाल्याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे तत्काळ व्यापक शोध व बचाव मोहीम हाती घेतली आहे. या सागरी भागात उपस्थित असलेल्या इतर व्यापारी जहाजांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा

मिचेल स्टार्कचा भेदक मारा; ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या पराभवाचा वचपा, मालिका १-१ ने बरोबरीत

तटरक्षक दलाची ‘वरद’ आणि ‘अनमोल’ जहाजे तैनात

बचाव मोहिमेला गती देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने आपली ‘वरद’ आणि ‘अनमोल’ ही अत्याधुनिक जहाजे घटनास्थळी रवाना केली आहेत. समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत खलाशांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत किती जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button