Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीराष्ट्रिय

‘आरक्षण गरिबांसाठी असावे’; दिल्लीतील जंतरमंतरवर जातीय आरक्षणाविरोधात आंदोलन

Jantar Mantar | जातीऐवजी आर्थिक परिस्थितीला प्राधान्य देऊन सरकारी मदत दिली जावी, अशी प्रमुख मागणी करत खुल्या प्रवर्गातील असंख्य नागरिकांनी शुक्रवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे जात-आधारित आरक्षण पद्धतीविरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात प्रामुख्याने पुरुषांचा सहभाग होता. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) समता नियमावलीलाही विरोध दर्शवला.

हातात फलक, भगवे झेंडे घेऊन आणि घोषणाबाजी करत आंदोलकांनी असा युक्तिवाद केला की, विद्यार्थ्यांना शिक्षण, कोचिंग आणि इतर गरजांसाठी जात नव्हे, तर आर्थिक स्थितीच्या आधारावर सरकारी मदत मिळायला हवी. ‘आरक्षण गरिबांसाठी, जातीसाठी नाही’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलकांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यालाही विरोध करत तो रद्द करण्याची मागणी केली. या कायद्याचे फायदे नेहमीच सर्वात वंचित घटकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्याचा गैरवापर केला जाऊ नये, म्हणून सरकारने आवश्यक पावले उचलावीत, असं त्यांनी म्हटलं. काही आंदोलकांनी आरक्षणामध्ये ‘क्रीमी-लेयर’ निकष लागू करण्याची मागणी केली; तसंच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीयांशी (OBC) संबंधित धोरणांमध्ये बदल करण्याची मागणी केली.

हेही वाचा

बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप: भारतीय महिला दुहेरी जोडी उपांत्य फेरीत!

पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेशी बोलताना एका आंदोलकाने सांगितलं, “आम्ही असं म्हणत नाही की आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मदत मिळू नये. आमचं म्हणणं आहे की मदत गरजूंपर्यंत पोहोचली पाहिजे, ज्यामध्ये शिष्यवृत्ती, फी सवलत आणि कोचिंगचा समावेश असावा.” आरक्षण लागू होऊन अनेक दशके झाली असतानाही ते अजूनही सुरू असल्याबद्दल काही आंदोलकांनी प्रश्न उपस्थित केले. आजच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून या धोरणाचा पुनर्विकास किंवा पुनरावलोकन करण्याची मागणी त्यांनी केली. “परिस्थिती आता खूप बदलली आहे. सध्याच्या चौकटीत सुधारणा करण्याची गरज आहे का आणि कोणावरही भेदभाव न करता आर्थिक मागासलेपण कसे दूर करता येईल, यावर व्यापक चर्चा व्हायला हवी”, असं एका आंदोलकाने सांगितलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button