TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अभिजीत दिपके यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

शाळेत परवानगीशिवाय पाहणी केल्याचा आरोप; ‘शाळेचे खरे वास्तव दाखवणे गुन्हा असेल तर अनेक गुन्हे अंगावर घेऊ’

लातूर : देशभरात ‘स्कूल ठीक करो’ अभियान राबवणारे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान सरकारी शाळांची दुरवस्था समोर आली. मात्र, शाळेची पाहणी करण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचा आणि औसा येथील शिक्षकांना धमकावून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत अभिजीत दिपके यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत दिपके यांनी लातूर दौऱ्यात सरकारी शाळांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने इतर शाळांमधील विद्यार्थ्यांना आणून बसवल्याचा आरोप करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा दर्जाही निकृष्ट असल्याचे त्यांनी दाखवून दिले. या मुद्द्यांवरून दिपके यांनी शिक्षण विभाग आणि सरकारवर जोरदार टीका केली.

हेही वाचा –  चाकण-तळेगाव महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासन ‘ॲक्शन’ मोडवर

शाळेचे वास्तव दाखवणे गुन्हा असेल तर अनेक गुन्हे अंगावर घेऊ’

या कारवाईनंतर CJPचे कार्यकर्ते अजिंक्य शिंदे यांनी प्रशासनावर टीका केली. शाळेची पाहणी करण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी सरकारी शाळांचे खरे वास्तव जनतेसमोर आणणे हा जर गुन्हा असेल तर असे अनेक गुन्हे अंगावर घेण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले.

पोषण आहाराच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह

अभिजीत दिपके यांच्या दौऱ्यात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचे तसेच स्वयंपाकघरामध्ये अस्वच्छता असल्याचे त्यांच्या पाहणीत आढळल्याचा दावा करण्यात आला.

याशिवाय आंबेगाव येथील एका शिक्षिकेने व्हिडीओच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांची परिस्थिती समोर आणली होती. त्यानंतर संबंधित शिक्षिकेवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती. माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर ही कारवाई मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आता दिपकेंच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून सरकारी शाळांमधील विविध समस्या समोर आणल्या जात असतानाच अभिजीत दिपके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक वळण मिळाले आहे. शाळांची पाहणी, शिक्षकांना धमकावल्याचा आरोप आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणावर अभिजीत दिपके काय भूमिका मांडतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button