Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

सोमालियाच्या किनाऱ्यावर जहाजाचं अपहरण; ६ भारतीयांसह १० क्रू मेंबर्स समुद्री चाचांच्या ताब्यात

तुर्कीचा शस्त्रसाठा घेऊन जाणाऱ्या जहाजावर चाचांचा हल्ला; नुगाल किनाऱ्याकडे नेल्याची माहिती, तुर्कस्तान अॅक्शन मोडमध्ये

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढलेला असतानाच सोमालियाच्या किनाऱ्यावरून एका जहाजाचे समुद्री चाचांनी अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या जहाजावर एकूण १० क्रू मेंबर्स असून त्यापैकी ६ जण भारतीय नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सोमालियाच्या पुटलँडजवळ सोमवारी या जहाजाचे अपहरण करण्यात आले. समुद्री चाचांनी जहाजाचा ताबा घेतल्यानंतर ते नुगाल समुद्र किनाऱ्याच्या दिशेने नेल्याची माहिती सोमालियातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.

हे जहाज पोलर मुव्हमेंट शिपिंगच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात आहे. या जहाजातून तुर्कीच्या शस्त्रसाठ्याची वाहतूक केली जात होती. मोगादिशूमध्ये असलेल्या तुर्कीच्या मिलिटरी ट्रेनिंग सेंटरसाठी हा शस्त्रसाठा नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, सोमालियाच्या किनाऱ्याजवळ पोहोचण्यापूर्वीच समुद्री चाचांनी जहाजाला लक्ष्य केले आणि त्याचा ताबा घेतला.

हेही वाचा –  सहा दशकांची ज्ञानयात्रा आता पिंपरी-चिंचवडमध्ये; ‘सपना’चे २६वे स्टोअर सुरू होणार!

जहाजावरील १० क्रू मेंबर्समध्ये ६ भारतीय नागरिक, एक तुर्की नागरिक, एक जॉर्जियाचा नागरिक आणि दोन सर्बियाचे नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे आठ समुद्री चाचांनी जहाजाचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेनंतर जहाजावरील क्रू मेंबर्सच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः सहा भारतीय नागरिकांचा समावेश असल्याने या प्रकरणाकडे भारताचेही लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याच समुद्री चाचांनी यापूर्वी २६ एप्रिल रोजी एका जहाजाचे अपहरण केले होते. त्यानंतर पुन्हा जहाजाचे अपहरण केल्याने सोमालियाच्या किनारपट्टीवरील समुद्री सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, जहाजावर तुर्कीचा शस्त्रसाठा असल्याची माहिती समोर आल्यानंतर तुर्कस्तानही या घटनेबाबत सक्रिय झाल्याचे चित्र आहे. जहाज आणि त्यावरील क्रू मेंबर्सच्या सुटकेसाठी पुढील हालचालींकडे आता लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button