ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पीसीईटी आणि इंडोनेशियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ नेगेरी, जकार्ता यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन

पिंपरी, पुणे :  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सर्व शाखांमध्ये नावीन्य, संशोधनातील उत्कृष्टता, शैक्षणिक गतिशीलता, आंतर विद्याशाखीय शिक्षण आणि जागतिक स्तरावर चालना देणारे प्रभावी सहयोग निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात या अंतर्गत परदेशातील अनेक नामांकित विद्यापीठ आणि आस्थापना बरोबर काम सुरू आहे अशी माहिती पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी दिली.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट मध्ये इंडोनेशियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ नेगेरी, जकार्ता यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट दिली. यावेळी दोन्ही विद्यापीठाची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील भागीदारी अधिक दृढ करणे. जागतिक स्तरावरील सहकार्याच्या नवीन संधी शोधणे या विषयावर चर्चा करण्यात आली होती.

यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, इंडोनेशियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ नेगेरी, जकार्ता चे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. इरियानी इंद्री हॅपसारी, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डेविंटा अरियानी, एज्युकेशनल सायकॉलॉजिस्ट डॉ. डीस्यांती, न्यूरोसायकॉलॉजिस्ट डॉ. रत्ना ड्याह सूर्यरात्री आणि विद्यार्थी प्रतिनिधी डॅरिएल रास्या, पीसीईटीच्या सेंटर फॉर युरोपियन स्टडीज प्रमुख डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, पीसीयू चे आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवसरकर, विज्ञान शाखा अधिष्ठाता आणि विभाग प्रमुख प्रा. रुची कुथियाला, सौरभ चव्हाण आदी उपस्थित होते.

हेही वाचा –  कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’! ठाकरे गटासह काँग्रेसच्या १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

यावेळी पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी पुणे आणि युनिव्हर्सिटी ऑफ नेगेरी जकार्ता यांच्या सहयोगाने ‘सपोर्टिंग माइंड्स : अ प्रॅक्टिकल गाइड टू सायकॉलॉजिकल अँड मेंटल हेल्थ फर्स्ट एड फॉर युनिव्हर्सिटी स्टुडंट्स’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या शिष्टमंडळाने पीसीसीओई मध्ये ही भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा शैक्षणिक दौरा आयोजित करण्यात आला होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button