Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

बिहारमध्ये श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! अशोक धाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ भाविकांचा मृत्यू

Bihar Temple Stampede Lakhisarai News | श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारनिमित्त भगवान महादेवाच्या दर्शनासाठी आणि जलाभिषेकासाठी जमलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोक धाम मंदिरात (श्री इंद्रदमनेश्वर महादेव मंदिर) सोमवारी सकाळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला असून डझनभर भाविक जखमी झाले आहेत.

श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरात सुमारे ५० हजार भाविक उपस्थित होते. अशोक धाम रेल्वे स्थानकाला मंदिराशी जोडणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी एक विजेचा खांब पडला होता. सोमवारी सकाळी या पडलेल्या खांबामध्ये विद्युत प्रवाह (करंट) उतरल्याची अफवा गर्दीत पसरली. या अफवेमुळे भाविकांमध्ये एकच घबराट उडाली आणि लोक सुरक्षित जागी पळण्यासाठी वाट मिळेल तिकडे धावू लागले. यातूनच भीषण चेंगराचेंगरी झाली आणि अनेक जण एकमेकांच्या पायाखाली तुडवले गेले.

हेही वाचा

पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ऑगस्टला महामोर्चा; सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत वाहतूक निर्बंध

जखमींवर लखीसराय रुग्णालयात उपचार सुरू

या दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तात्काळ लखीसराय येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, यापूर्वी २०१९ मध्येही याच मंदिरात श्रावण यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन एकाचा मृत्यू झाला होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button