ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणेरी यलमार स्नेहमेळावा उत्साहात; ‘झेप’ पुस्तकाचे प्रकाशन

पिंपरी : पुणेरी यलमार परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी अमोल येलमर लिखित ‘झेप : अस्तित्वातून कर्तृत्वाकडे’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला रंगनाथ यलमार, जी. एस. माडगूळकर, अमोल माडगूळकर, शशिकांत येलपले, डॉ. बिपीन विभुते, सुभाष यलमार, राजाराम येलपले, कल्पना अंपळकर, आशा चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ‘आरोग्य दूत’ पुरस्काराने डॉ. बिपीन विभुते, ‘क्रीडा गौरव’ पुरस्काराने दिलीप येलपले, ‘रोजगार भूषण’ पुरस्काराने दत्ता विभुते व सारंग गिड्डे यांचा गौरव करण्यात आला. तसेच ‘प्रगतीशील शेतकरी’ पुरस्काराने दत्तात्रय (बापू) कोळवले, साधू किसन कोळवले आणि संजय सीताराम चौगुले यांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा –  ‘दहीहंडीला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करणार’; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार

याशिवाय ‘युद्धवीर गौरव’ पुरस्काराने किसन घाटुळे, ‘ज्ञानसेवा गौरव’ पुरस्काराने संजय चौगुले, तर ‘नारी शक्ती उड्डाण गौरव’ पुरस्काराने कु. रेवती लोकरे यांचा सन्मान करण्यात आला.

स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याबरोबरच नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन मिळाले, तर ‘झेप’ पुस्तकाच्या प्रकाशनामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button