Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘वंदे मातरम’ वादावरून सोनिया गांधी यांच्याविरोधात कर्नाटकात पोलीस तक्रार

नवी दिल्ली | स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील इंदिरा भवन येथील कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ गीत सुरू असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी भाजप नेते विकास पुत्तूर यांनी कर्नाटकातील मंगळुरू येथील उरवा पोलीस ठाण्यात सोनिया गांधी यांच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. कर्नाटक पोलिसांनी यावर कारवाई न केल्यास थेट उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजप नेते विकास पुत्तूर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राष्ट्रीय गीत सुरू असताना अशा प्रकारे व्यत्यय आणणे हा ‘वंदे मातरम’चा थेट अवमान आहे. “जर कर्नाटकातील काँग्रेस सरकार आणि स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली नाही, तर मी याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेईन. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,” अशी भूमिका पुत्तूर यांनी मांडली.

हेही वाचा

शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाबाबत भारतीय न्यायालय घेणार निर्णय

काँग्रेसने काय स्पष्टीकरण दिलं?

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावत हा वाद निरर्थक असल्याचे स्पष्ट केले. रमेश म्हणाले की, “इंदिरा भवनमधील कार्यक्रमात ‘वंदे मातरम’चे पूर्ण व्हर्जन गायले गेले असून राष्ट्रगीत थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. काँग्रेस पक्षाध्यक्ष बरेच वेळ उभे असल्याने, त्यांच्यासाठी खुर्ची आणून देण्याची सूचना सोनिया गांधी करत होत्या.” राजकीय फायद्यासाठी भाजपकडून या घटनेचा विपर्यास केला जात असल्याचा प्रत्यारोप काँग्रेसने केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button