Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

हॉटेलमध्ये जेवताना ‘या’ चार गोष्टी तपासा; तुकाराम मुंढेंचा नागरिकांना सल्ला

स्वच्छता आणि परवाना तपासण्याचे आवाहन; फॅटयुक्त, खारट आणि गोड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवण्याचा सल्ला

मुंबई : राज्यभरात भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) धडक कारवाई सुरू असताना, नागरिकांनी बाहेर जेवताना अधिक जागरूक राहावे, असे आवाहन एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थ घेताना चार महत्त्वाच्या बाबी तपासण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

मुंढे यांनी सांगितले की, नागरिकांनी सर्वप्रथम हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधील स्वच्छता तपासावी. खाद्यपदार्थांची हाताळणी, स्वयंपाकघर आणि परिसर स्वच्छ आहे का, याकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे. त्यानंतर संबंधित हॉटेल किंवा खाद्यपदार्थ विक्री केंद्र नोंदणीकृत आणि परवानाधारक आहे का, हे तपासणे आवश्यक आहे.

तसेच, बाहेर जेवताना काय पदार्थ ऑर्डर करायचा, याचाही विचार करणे गरजेचे आहे. जास्त फॅटयुक्त, खारट आणि गोड पदार्थांचे नियमित सेवन टाळावे. असे पदार्थ अधूनमधून घेतले तरी चालतील; मात्र त्यांचे प्रमाण आणि वारंवारता नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  ‘लेक लाडकी’ योजनेची प्रक्रिया सुलभ; पालकांना आता ऑनलाइन अर्जाची सुविधा

याशिवाय प्रत्येक व्यक्तीने आपल्या वय आणि आहाराच्या गरजेनुसार योग्य अन्नाची निवड करावी. केवळ पदार्थ स्वच्छ पद्धतीने तयार झाला आहे का, एवढाच विचार न करता तो आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे का, याचाही विचार करणे आवश्यक आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त दूध, पनीर, मिठाई, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ तसेच गुटख्याविरोधात कारवाईला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button