Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाडीबीटीवर आणखी २९ योजनांचा समावेश; योजनांची संख्या १०५ वर

नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे होणार अधिक सुलभ; सर्व योजना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट

मुंबई : राज्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आणखी २९ योजनांचे ऑनबोर्डिंग करण्यात आले आहे. त्यामुळे पोर्टलवरील कार्यान्वित योजनांची संख्या आता १०५ झाली आहे. शासनाच्या उर्वरित योजनाही टप्प्याटप्प्याने महाडीबीटीवर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित २९ नवीन योजनांच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  हॉटेलमध्ये जेवताना ‘या’ चार गोष्टी तपासा; तुकाराम मुंढेंचा नागरिकांना सल्ला

महाडीबीटीमुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले असून, गैरवापर कमी होण्यास मदत झाली आहे. भविष्यात शासनाच्या सर्व प्रमुख योजना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाण्याची गरज कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

नवीन २९ योजनांमध्ये इतर मागासवर्गीय विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या योजनांचा समावेश आहे. महाडीबीटी २.० मध्ये सिंगल साइन-ऑन, लाईव्ह डॅशबोर्ड, आधार आधारित पडताळणी आणि थेट लाभ हस्तांतरणासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय आणखी २३१ योजनांचे ऑनबोर्डिंग प्रक्रियेत असल्याची माहिती देण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button