ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपुणे

पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. विक्रम काळे; सरचिटणीसपदी प्रा. हिंमत तोबरे!

संचमान्यता, शालार्थ, वेतन, सेवा-सुरक्षिततेसह शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आक्रमक पाठपुराव्याचा निर्धार

पुणे | पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी प्रा. विक्रम काळे, तर सरचिटणीसपदी प्रा. हिंमत तोबरे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली.

नौरोसजी वाडीया कॉलेज, पुणे येथे ९ ऑगस्ट रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा राज्य महासंघाचे सरचिटणीस प्रा. लक्ष्मण रोडे यांनी भूषविले. यावेळी संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध सेवाविषयक आणि प्रशासकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संचमान्यता, शालार्थ आयडी, वेतन, निवड व वरिष्ठ श्रेणी, सेवा-सुरक्षितता, वैयक्तिक मान्यता आणि ऑनलाइन प्रक्रियांसह विविध प्रश्नांवर शिक्षकांनी भूमिका मांडली. या प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन अध्यक्ष प्रा. लक्ष्मण रोडे आणि सरचिटणीस प्रा. विक्रम काळे यांनी दिले.

यानंतर प्रा. पंडितराव पाटील, प्रा. संतोष फाजगे, प्रा. एम. एस. शहापुरे आणि प्रा. शंकर पवार यांनी संघटनात्मक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया पार पडली.

हेही वाचा

घाटकोपरमध्ये मध्यरात्री दरड कोसळून दोघांचा मृत्यू, ३-४ घरे ढिगाऱ्याखाली

२४ सदस्यीय कार्यकारिणी

नवनिर्वाचित कार्यकारिणीत पुणे शहरातून प्रा. हिंमत तोबरे, प्रा. राजेंद्र निकत, प्रा. संदिप चौधरी, प्रा. विनोद जाधव, प्रा. पृथ्वीराज जाधव, प्रा. पांडुरंग कंद, प्रा. सादिक दुरुग आणि प्रा. विष्णू देवडकर यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमधून प्राचार्य विक्रम काळे, प्रा. गोपीचंद करंडे, प्रा. गंगाधर घाटगे आणि प्रा. सौ. मिना मेरूकर यांची निवड झाली. याशिवाय पुरंदरमधून प्रा. सुंदर लोंढे, बारामतीमधून प्रा. राहुल गोलांदे, इंदापूरमधून प्रा. संतोषकुमार हांडे, दौंडमधून प्रा. राजेंद्र होले, खेडमधून प्रा. संतोष गावडे, मुळशीमधून प्रा. बब्रुवाहन घोडके, जुन्नरमधून प्रा. शरद मनसुख, आंबेगावमधून प्रा. रामचंद्र वळसे, शिरूरमधून प्रा. नानासाहेब गावडे, भोरमधून प्रा. सोमनाथ सोडमिसे, हवेलीमधून प्रा. बाळासाहेब गायकवाड आणि मावळमधून प्रा. सौ. वीना भेगडे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

पदाधिकाऱ्यांची निवड

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्षपदी प्रा. विक्रम काळे, कार्याध्यक्षपदी प्रा. सुंदर लोंढे, सरचिटणीसपदी प्रा. हिंमत तोबरे यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी प्रा. राजेंद्र निकत (पुणे शहर), प्रा. बब्रुवाहन घोडके (ग्रामीण) आणि प्रा. बाळासाहेब गायकवाड (ग्रामीण) यांची निवड झाली. सहचिटणीसपदी प्रा. गोपीचंद सदाशिव करंडे आणि प्रा. रामचंद्र वळसे, तर कोषाध्यक्षपदी प्रा. सौ. वीना भेगडे यांची निवड करण्यात आली. समन्वयक म्हणून प्रा. विष्णू देवडकर, प्रा. नानासाहेब गावडे आणि प्रा. संतोषकुमार हांडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. पंडितराव पाटील, प्रा. संतोष फाजगे, प्रा. शंकर पवार आणि प्रा. एम. एस. शहापुरे यांनी काम पाहिले.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा

बदलत्या शैक्षणिक आणि प्रशासकीय परिस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसमोरील प्रश्न अधिक व्यापक होत असल्याने सेवा-सुरक्षितता, संचमान्यता, शालार्थ, वैयक्तिक मान्यता, वेतन, वरिष्ठ व निवड श्रेणी, पेन्शन तसेच प्रलंबित सेवाविषयक प्रकरणांसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करणार आहे. संघटनेचे कामकाज अधिक अभ्यासपूर्ण, पारदर्शक, संघटित आणि संवादात्मक करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार संघर्षाची भूमिका घेण्याचा निर्धार नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला. “व्यक्तीपेक्षा संघटना मोठी, पदापेक्षा जबाबदारी मोठी आणि संघटनेपेक्षा शिक्षकहित मोठे,” या भूमिकेतून पुणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या न्याय्य हक्क, सन्मान, सेवा-सुरक्षितता आणि शैक्षणिक हितासाठी कार्य करण्याचा संकल्प नवनिर्वाचित कार्यकारिणीने केला आहे.“संघटित राहूया, सक्षम होऊया आणि शिक्षकहितासाठी लढूया,” असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button