श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर; आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित!

Eetha Movie Release Date Postponed | प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित ‘ईठा’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आधी २८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता श्रद्धाच्या चाहत्यांना या सिनेमासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार असून, हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित असलेल्या या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या २ मिनिटे ३ सेकंदाच्या दमदार टीझरला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात श्रद्धासोबत रणदीप हुड्डा, नाना पाटेकर, अनंत जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे.
हेही वाचा
TOOFAN ke liye taiyaar rehna… kyunki #EETHA aa rahi hai, 4th December ko! 💃🔥 pic.twitter.com/K9Ss2IjEOT
— Maddockfilms (@MaddockFilms) August 11, 2026
‘मॅडडॉक’ फिल्म्सने “तुफान येतंय… तुम्ही तयार राहा कारण, ‘ईठा’ येतेय ४ डिसेंबरला…” अशा कॅप्शनसह नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे.
साऊथ सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’ हा चित्रपट २६ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. बॉक्स ऑफिसवर होणारा हा मोठा क्लॅश टाळण्यासाठी तसेच चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम बाकी असल्याने निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात रंगली आहे.





