कोलंबियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाने हाहाकार; १३२ जणांचा मृत्यू, १५०० हून अधिक घरे उद्ध्वस्त

Colombia Earthquakes | दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देश भीषण भूकंपाने हादरला आहे. ७.४ रिष्टर स्केल तीव्रतेच्या या विनाशकारी भूकंपामुळे आतापर्यंत १३२ नागरिकांचा मृत्यू झाला असून ८७ जण गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपामुळे १५०० हून अधिक घरांचे आणि ६१ इमारतींचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोध व मदत कार्य सुरू आहे.
भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू ‘चोको’ या भागात होता. हा भाग कोलंबियातील अत्यंत गरीब वस्तीचा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या समूहांचा परिसर मानला जातो. पश्चिम कोलंबियातील काली, क्विब्डो आणि परेरा या शहरांच्या आसपासच्या भागांत भूकंपाचे जोरदार धक्का बसले आहेत. काही दुर्गम आणि जंगल भागांत पोहोचणे अवघड असल्याने बचाव पथके जलमार्ग आणि हवाई मार्गाचा वापर करून आपद्ग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवत आहेत. हा भूकंप कोलंबियाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा
रशीद खान चमकला! आयर्लंडवर मात करत अफगाणिस्तान थेट वनडे वर्ल्डकपसाठी पात्र
Powerful 7.4-magnitude earthquake struck Manizales, Colombia 🇨🇴 (10.08.2026) pic.twitter.com/zoWkaaWDGG
— Disaster News (@Top_Disaster) August 10, 2026
अध्यक्ष अबेलार्डो दे ला एस्प्रीएला यांच्याकडून तातडीच्या मदतीचे आदेशकोलंबियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अबेलार्डो दे ला एस्प्रीएला यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ मदत आणि बचाव कार्याचे आदेश दिले आहेत. लष्कर आणि आपत्कालीन यंत्रणांना बाधित क्षेत्रांमध्ये तैनात करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांना भूकंपाच्या पुढील संभाव्य धक्क्यांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.





