डेबिट कार्डशिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या सोपी पद्धत आणि मर्यादा

UPI ATM Cash Withdrawal: आपण एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी सामन्यत: आपल्या डेबिट कार्डचा वापर करतो.सर्वसाधारणपणे आपले डेबिट./क्रेडीट कार्ड आपल्या पाकिटात असते.(क्रेडीट कार्ड सुद्धा एटीएम मधून रोख रक्कम काढता येते, मात्र फार क्वचितच क्रेडीट कार्डचा वापर केला.) पण आपण घाई घाईत निघताना आपले पाकीट घ्याला विसरला आहात आणि आपल्याला तातडीने रोख रकमेची गरज असेल तर एक तर परत घरी जाऊन पाकीट घ्यावे लागेल किंवा कुणाकडून तात्पुरते उसने पैसे घ्यावे लागतील. मात्र आता एटीएम मधून रोख रक्कम काढण्यासाठी आपल्या जवळ डेबिट/क्रेडीट कार्डअसण्याची गरज नाही. कारण आता आपल्या मोबाईलमधील कोणतेही युपीआयअॅप (उदा: गुगलपे, फोनपे किंवा भीम) वापरून एटीएम मधून रोख रक्कम काढता येते. खरे तर सुविधा सुरु होऊन सुमारे तीन वर्षांचा कालावधी होऊन गेला आहे तथापि अजूनही बहुतेकांना या बाबत फारसी माहिती नाही.
युपीआय-एटीएम ही डेबिट/क्रेडीट कार्ड शिवाय एटीएम मधून रोख रक्कम काढण्याची सुविधा आहे. याला इंटर पोर्टेबल कार्डलेस युपीआय (ICCW) असे म्हणतात. हीसुविधा एनपीसीआय व हिताचीपेमेंट सर्व्हिसेस यांनी मिळून सुरु केली आहे. या सुविधेमुळे आपण ज्या प्रमाणे भाजी घेताना, नाटक/सिनेमाचे तिकीट काढताना , पेट्रोल भरताना क्यू आरकोड स्कॅन करून पेमेंट करतो त्याच प्रमाणे क्यू आर कोड स्कॅन करून एटीएम मधून रोख रक्कम काढू शकतो.
हेही वाचा – आज हो म्हणतात, उद्या नाही! BCCI ने रोहितसोबत खेळ थांबवावा; मुंबईच्या मोठ्या खेळाडूने वर्ल्डकपआधी निवड समितीला सुनावलं
ही सुविधा कसी वापरता येते ?
आता बहुतांश प्रमुख बँकाच्या एटीएम वर हीसुविधा उपलब्ध आहे, अशा एटीएम मधून कार्ड शिवाय रक्कम काढण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
अ) युपीआयअॅप स्क्रीनवर युपीआय युपीआय किंवा ICCW हा पर्यायनिवडा
ब)आपल्याला काढायची असणारी रक्कम एंटर (प्रविष्ट) करा उदा:रु.५०००
क)एटीएम स्क्रीनवर दिसणारा क्यूआर कोड आपल्या मोबाईल मधील युपीआयअॅप उघडून स्कॅन करा.
ड)आपल्या युपीआयअॅपला सलग्न असणाऱ्याज्या बँक खात्यातून रक्कमकाढायची आहे ते निवडा व पीन टाका. एटीएम ट्रे मध्ये आलेली रक्कम घ्या .
ही सुविधा वापरून किती रक्कम काढता येते?
एकावेळी जास्तीतजास्त रु.१०००० काढता येतात,एका रक्कम दिवसात काढण्याची मर्यादा बँकेनुसार कमी अधिक असू शकते व ती रु.२०००० किंवा त्याहून अधिक असू शकते.एप्रिल २०२६ पासून काही बँकांनी दैनिक मर्यादा कमी केल्या आहेत असे समजते तरी आपल्या बँकेची ही मर्यादा माहित करून घेऊन त्यानुसार व्यवहार करावा. युपीआय-एटीएम(कार्ड लेस कॅश विड्रावल सुविधा) ही सुविधा आता मासिक मोफत एटीएम व्यवहारात समाविष्ट असते. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यावर प्रती व्यवहारास रु.२३ + जीएसटी द्यावे लागतात.
ही सुविधा वापरताना डेबिट कार्डचा पीन वापरता येतो का?
नाही, ही सुविधा वापरताना आपल्याला आपला युपीआय पीन टाकावा लागतो आणि तो ही आपल्या युपीआयअॅप वर एटीएम की पॅड नाही.
या सुविधेचे नेमके काय फायदे आहेत ?
मोबाईलआपल्या सततजवळच असल्याने केंव्हाही व कुठेही रोख रक्कम काढणे शक्य होते.
आपले कार्ड सोबत ठेवण्याची गरज नसल्याने कार्ड हरविण्याची, तसेच क्लोन होण्याचा धोका असत नाही
तसेच एटीम पिन लक्षात ठेवण्यची गरज असत नाही. युपीआय पीन वापरूनच एटीएम मधून रोख रक्कम काढता येते.
रक्कम काढताना टाकावा लागणारा पीन एटीएम की पॅड वर टाकावा लागत नाही तर तो आपल्या मोबाईलमधील युपीआयअॅपवर टाकावा लागतो त्यामुळे आपला पीनजास्त सुरक्षित राहतो.
एटीएम स्क्रीन वर येणारा क्यू आर कोड दर काही मिनिटानी बदलतो
त्यामुळे फसवणूक होण्याचा धोका अगदी कमी असतो.
सर्व बँका ही सुविधा देऊ करतात का?
सध्यातरी जरी सर्व बँका ही सुविधा देत नसल्या तरी बहुतांश राष्ट्रीयकृत बँका जसे कि एसबीआय, बँक ऑफ बरोडा , इंडिअन बँक, इंडिअन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक , कॅनरा बँक यासारख्या प्रमुख राष्ट्रीयकृत बँका, एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक, एक्सिस इंद्सिंध यासारख्या प्रमुख खाजगी बँका तसेच काही लागू वित्त बँका(स्मॉल फायनांस बँकस हि सुविधा देऊ करत आहेत.नजीकच्या भविष्यात उर्वरित बँका सुद्धा ही सुविधा देऊ करतील.





