TOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

आज हो म्हणतात, उद्या नाही! BCCI ने रोहितसोबत खेळ थांबवावा; मुंबईच्या मोठ्या खेळाडूने वर्ल्डकपआधी निवड समितीला सुनावलं

Ajinkya Rahane on Rohit Sharma 2027 ODI World Cup : गेल्या जवळपास वर्षभरापासून भारतीय क्रिकेटमध्ये एकच चर्चा रंगली आहे. रोहित शर्मा 2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही? इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यानही रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, रोहितने अद्याप निवृत्तीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे त्याच्या वर्ल्डकपमधील सहभागाबाबतच्या चर्चांना अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही. याच पार्श्वभूमीवर नुकताच निवृत्तीचा निर्णय घेतलेल्या अजिंक्य रहाणेने रोहितच्या वर्ल्डकपमधील सहभागाबाबत महत्त्वाचं मत मांडलं आहे. निवड समितीने रोहितबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा आणि त्याला 2027 च्या वर्ल्डकपसाठी आतापासूनच तयार ठेवावं, असं रहाणेने म्हटलं आहे.

‘रोहित वर्ल्डकप खेळणार, हे स्पष्ट सांगा…’

रहाणेने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हटलं की, टीम मॅनेजमेंटने रोहितला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की तो 2027 चा वर्ल्डकप खेळणार आहे. रहाणे म्हणाला, “मला वाटतं की रोहित शर्माला हे सांगणं गरजेचं आहे की तो 2027 मध्ये होणारा वर्ल्डकप खेळणार आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये त्याने दिलेलं योगदान पाहिलं तर ते शानदार राहिलं आहे. तो खेळणार आहे की नाही, याबाबत चर्चा व्हायलाच नको. एकदा तुम्ही रोहितला सांगितलं पाहिजे की तू खेळणार आहेस. प्रत्येक मालिकेनुसार निर्णय घेता येणार नाही, कारण तो खूप मोठा खेळाडू आहे.”

हेही वाचा –  जिम किंवा डाएट करण्याची काहीही गरज नाही, काही छोट्या बदलांनी वजन करा कमी…

रोहित आणि रहाणे यांनी मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकत्र खेळलं आहे. तसेच सध्याचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर हे देखील मुंबई क्रिकेटमधूनच पुढे आले आहेत. त्यामुळे रोहितच्या क्षमतेची आणि अनुभवाची या दोघांनाही चांगलीच कल्पना आहे.

रोहितच्या अनुभवाचा वर्ल्डकपमध्ये फायदा घ्या

रोहितच्या अनुभवाचा भारताने 2027 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये योग्य पद्धतीने वापर करायला हवा, असंही रहाणेने स्पष्ट केलं. तो म्हणाला, “क्रिकेट हा लयीत खेळला जाणारा खेळ आहे. तुम्ही किती सामने खेळला आहात, तुम्ही युवा आहात की अनुभवी, याने फारसा फरक पडत नाही. तुमच्याकडे लय असणं महत्त्वाचं आहे. तुमचं मन मोकळं नसेल तर तुम्ही खेळू शकणार नाही.”

रोहितच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरजच नसल्याचंही रहाणेने सांगितलं. “रोहितच्या क्षमतेबद्दल बोलायचं झालं तर त्यावर चर्चा करण्याची गरजच नाही. त्याच्यासारखा अनुभव संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे ही चर्चा व्हायलाच नको. त्याला 2027 चा वर्ल्डकप खेळायचा असेल, तर त्याने तो खेळलाच पाहिजे,” असं रहाणेने म्हटलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button