ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण

Farmer Loan Waiver : राज्य सरकारने केलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या घोषणेनंतर आणि आतापर्यंतची राज्यातील ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा दावा केल्यानंतर कर्जमाफीची रक्कम खात्यात नेमकी कधी येणार याकडे बळीराजाच्या नजारा लागल्या आहे. अशातच, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील 16 लाख 96 हजार शेतकरी यादी जाहीर केली होती. त्यासंदर्भात आज शेतकऱ्यांच्या बँक खातात पैसे जाणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणी येत आहे. पुढील यादी आज (5 ऑगस्ट) किंवा उद्या (6 ऑगस्ट) जाहीर होण्याची शक्यता आहे. तर काही तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरु आहे. 11 लाख शेतकरी या यादीत आहे. त्यांना जवळपास 8 हजार करोड मिळणार आहेत. मात्र यातील 13 लाख खाती अशी आहेत ज्यामध्ये आधार चुकले आहे, कर्जाचे व्याज जास्त आहे. ते दुरुस्त करायला सांगीतल आहे. बॅंकेकडे हि खाती पाठवले असल्याची माहिती देत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीतील अडचणींवर भाष्य केलं आहे.
दरम्यान, आयकर विभागाचा संपुर्ण डेटा आला आहे. यात 94 लाख आयकर भरणारे शेतकरी आहेत. त्यामुळे सर्व अडचणी दूर करून कृषी सन्मान योजनेतील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा मोठा लाभ मिळणार असल्याचा विश्वासही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
हेही वाचा – पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’चा शुभारंभ; निगडीच्या अमृता विद्यालयम् व जुनिअर कॉलेजचा उत्स्फूर्त सहभाग
कर्जमाफीची नेमकी आकडेवारी काय? सहकार मंत्री बाबासाहेब पाटील काय म्हणाले?
- आतापर्यंत 16 लाख 96 हजार पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची यादी जाहीर करण्यात आली आहे.
- आतापर्यंत 11 लाख 46 हजार पात्र शेकऱ्यांनी आधारप्रामाणिकरण केलेले आहे.
- पुढील यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता
- या कर्जमुक्ती योजनेसाठी दिनांक १ एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जांचा या योजनेत समावेश आहे. 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जांना या योजनेचा लाभ मिळेल.
- राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार बँक खात्याशी संलग्न करावे, आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि शासन व बँकांनी दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.
- योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- आपल्या सरकार सेवा केंद्रावर गेल्यानंतर पात्र शेतकऱ्यांसाठी एकदम सोपी प्रक्रिया आहे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. त्याआधारे ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. राज्यभरातील सुमारे ३२ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी, आर्थिक शिस्तीला प्रोत्साहन देणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी योजना आहे. शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने हे राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.” अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलीय
नाशिक जिल्ह्यातील 35 हजार 890 शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापर्यंत कर्जमाफीचे पैसे होणार जमा…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 35 हजार 890 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी 27 हजार 283 शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून, उर्वरित शेतकऱ्यांनीही लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 23 हजार 798 शेतकरी सभासद आहेत यापैकी 21 हजार 712 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी 17 हजार 174 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. उर्वरित लाभार्थ्यांनीही तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा बँकेने केले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत तरी एकही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नसली, तरी सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होत असून उद्यापासून (6 ऑगस्ट) पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हा बँक प्रशासनाने दिली आहे. नाशिक जिल्ह्यातून जिल्हा बँकेचे 23 हजार 798 आणि राष्ट्रीयकृत बँकांचे 45 हजार 61, असे एकूण 68 हजार 859 खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 35 हजार 890 शेतकरी पात्र ठरले आहेत.





