व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये आंतरशालेय संस्कृत नाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न
सिटी प्राईड शाळेने पटकावला प्रथम क्रमांक

चिंचवड (प्रतिनिधी):
व्ही. के. माटे हायस्कूल, चिंचवड येथे संस्कृत दिनाचे औचित्य साधून कै. श्रीमती शकुंतला माटे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आंतरशालेय संस्कृत नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या व्यंकटनाथ सभागृहात ही स्पर्धा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. आरती कन्हाडकर (करडकर) उपस्थित होत्या. तसेच व्ही. के. माटे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. इंद्रायणी माटे पिसोळकर मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली. या दोन्ही मान्यवरांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
स्पर्धेत D. I. C. इंग्लिश माध्यम शाळा, सिटी प्राईड शाळा, समर्थ विद्यालय, मनोरम प्राथमिक शाळा आणि व्ही. के. माटे हायस्कूल या शाळांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येक संघात किमान ३ ते कमाल ७ विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने उपस्थितांची मन जिंकली.
हेही वाचा – विमा नाही तर पेट्रोल नाही? पंपावर वाहन इन्शुरन्सची तपासणी! नियम तोडल्यास घरपोच चलान? मोठी अपडेट वाचली का?

स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक: सिटी प्राईड शाळा
द्वितीय क्रमांक: D. I. C. इंग्लिश माध्यम शाळा
तृतीय क्रमांक: समर्थ विद्यालय
उत्तेजनार्थ: व्ही. के. माटे हायस्कूल
वैयक्तिक पारितोषिके (उत्कृष्ट अभिनय):
प्रथम: आदित्य भोसले
द्वितीय: अमेय देवस्थळी
उत्तेजनार्थ: अथर्व इंदूरकर आणि अनुश्री पाटील
लेखन व दिग्दर्शन:
लेखन: सौ. रुपाली इनामदार, सौ. मैत्रेयी राजे
दिग्दर्शन: सौ. चित्रा देशपांडे, गायत्री जोशी





