Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

“देशाच्या भविष्यापेक्षा तुमची त्वचा अधिक उजळ”; अभिजीत दिपकेंची पंतप्रधान मोदींवर खोचक टिप्पणी

Abhijeet Dipke | देशभरातील पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संसदेत ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक २०२६’ मंजूर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक ‘सेल्फी व्हिडिओ’ शेअर करत सरकारची भूमिका मांडली आहे. मात्र, या व्हिडिओवरून ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदींवर अत्यंत खोचक आणि खरमरीत शब्दांत टीका केली आहे. “देशाच्या भविष्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्वचा अधिक उजळ आहे,” असा टोला अभिजीत दिपके यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच ‘इन्स्टाग्राम’वर एक सेल्फी व्हिडिओ शेअर करत संसदेत मंजूर झालेल्या नवीन कायद्याचे कौतुक केले होते. “परीक्षा पद्धत पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्याच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. पेपर माफियांचा पायबंद करण्यासाठी सरकार कठोर कायदेशीर पावले आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत राहील,” असे आश्वासन पंतप्रधानांनी या व्हिडिओद्वारे दिले होते. पेपर लीकच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी शेअर केलेला हा सलग चौथा सेल्फी व्हिडिओ होता.

हेही वाचा

भालाफेकमध्ये भारताचा डंका! नीरज चोप्रासह रोहित आणि यश अंतिम फेरीत दाखल

अभिजीत दिपके यांनी याआधीही पंतप्रधानांच्या या सोशल मीडिया स्टाइलवर टीका केली होती. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते, “माझ्या मते पंतप्रधान मोदींनी राजकारण सोडून ‘सोशल मीडिया इन्फ्लुएंसर’ बनावे. ते काम ते खूप उत्तम प्रकारे करत आहेत. जर ते एवढे चांगले इन्फ्लुएंसर असतील, तर त्यांनी पंतप्रधानपद सोडून द्यावे आणि दुसऱ्या कोणाला तरी ते काम करू द्यावे.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button