Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

पुणे ते सातारा धो-धो बरसणार; नदी नाले तुडुंब भरणार; हवामानाचा नवा अंदाज काय?

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरातील काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याचेही समोर आले आहे. अशातच आता हवामान विभागाने मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भातील जिल्हांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यातील काही भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या राज्याच्या कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हवामान विभागाने 27 जुलैसाठी पावसाचा अंदाज जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे आणि साताऱ्यासह कोल्हापूरला उद्या मुसधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईसह विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. थासकरून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा –  ‘पैशांअभावी शस्त्रक्रिया थांबणार नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याच्या क्षेत्रामुळे 26 आणि 27 जुलै रोजी ओडिशामध्ये, तसेच 27 जुलै रोजी छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय 26 आणि 27 जुलै रोजी गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्येही अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 28 ते 31 जुलै दरम्यान हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पंजाब येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 28 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत पश्चिम उत्तर प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस होऊ शकतो. 29 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत पूर्व राजस्थानातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button