“पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा कधी?” अभिनेत्री श्वेता तिवारीची पोस्ट व्हायरल!

Shweta Tiwari | गेल्या महिनाभरापासून नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. संपूर्ण देशातून पाठिंबा मिळालेल्या या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी (२५ तारीख) आपल्या पदाचा राजीनामा दिला. या ऐतिहासिक विजयानंतर विद्यार्थी संघटना आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) वर सिनेविश्वासह संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गेल्या ३६ दिवसांपासून जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत ठाण मांडून बसले होते. अखेर प्रशासनाला नमवून राजीनामा मिळवण्यात आंदोलकांना यश आले. या यशानंतर पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “जर आपण सरकारसमोर हार मानली नाही आणि एकजुटीने लढलो, तर आपण अनेक गैरप्रकार करणाऱ्या लोकांचे राजीनामे घेऊ शकतो.”

हेही वाचा
अनाहत सिंगनं रचला इतिहास! ज्युनियर स्क्वॉश विश्व अजिंक्यपद स्पर्धेचं पटकावलं विजेतेपद
श्वेता तिवारीची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी हिने अभिजीत दिपके यांचा भाषणाचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत एक नवा मुद्दा उपस्थित केला आहे.
श्वेताने पंजाबमधील शिक्षण व्यवस्थेतील मुद्द्यांकडे लक्ष वेधत विचारले “आता पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? आणि कॉक्रोच जनता पार्टी, तुम्ही पंजाबमध्ये आंदोलन कधी करणार?” श्वेता तिवारीच्या या पोस्टमुळे आता पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैंस यांच्या राजीनाम्याची मागणी चर्चेत आली असून, हे आंदोलन आगामी काळात पंजाबमध्येही सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





