Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘जसं गोडसेने शांत डोक्याने गांधींचा खून केला, तसंच फडणवीस..’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा काहीसा मागे पडला असताना ओबीसी समाजाकडून मोर्चे काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सपकाळ यांनी केलेल्या या विधानावर भाजपकडून प्रत्युत्तर देखील देण्यात आले आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे भांडणं लावून देतात. जसे नथूराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला, त्या शांत पद्धतीने देवेंद्र फडणवीस भांडणं लावतात आणि बाजूला उभे राहातात. या सर्वामध्ये त्यांनी हा खेळ खेळू नये आणि लवकर जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, ही काँग्रेस पक्षाची मागणी आणि भूमिका आहे.

हेही वाचा      :        “धर्मावर चालणारे राजकारण फार काळ टिकणार नाही”; उपमुख्यमंत्री अजित पवार 

भाजपाचे प्रत्युत्तर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवाभाऊंवर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली. हा हर्षवर्धन सपकाळ यांच्या नालायकपणाचा आणि निर्लज्जपणाचा कळस आहे. एकाबाजूला महात्मा गांधींचं नाव घ्यायचे आणि नथुराम गोडसेबरोबर तुलना करायची याबद्दल सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, असे नवनाथ बन म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button