TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

“शॉर्टकट एकदिवस तुम्हालाच कट करेल”; Gen-Z तरुणांना पंतप्रधान मोदींचा इतरांच्या अनुभवातून शिकण्याचा सल्ला

PM Modi on Gen-Z : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या Gen-Z तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे. आजच्या तरुणांनाही शॉर्ट्कटचा मार्ग स्वीकारू नये तसेच इतरांच्या अनुभवातून शिकावे असे आवाहन देखील केले आहे.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आत्मचरित्र, “द ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाईफ, माय स्ट्रगल,” बुधवारी नवी दिल्लीत प्रकाशित झाले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. यावेळी  Gen-Z तरुणांना उद्देशून हे विधान केले.

पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमादरम्यान, केवळ कोविंद यांच्या सार्वजनिक जीवनाची आणि त्यांच्या संघर्षाची प्रशंसाच केली नाही, तर देशातील तरुण पिढीला, विशेषतः ‘जेन-झेड’ला, सोशल मीडियाच्या युगात झटपट यश मिळवण्याची मानसिकता टाळण्याचा सल्लाही दिला.

पंतप्रधान म्हणाले की, आजचे युग रील्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे आहे. परिणामी, तरुण पिढी सतत विविध विचार आणि जीवनशैलीच्या उदाहरणांच्या संपर्कात येत आहे. ते म्हणाले की, या वातावरणात काहीही साध्य करण्यासाठी शॉर्टकट घेण्याची प्रवृत्ती झपाट्याने वाढली आहे, परंतु जीवनात प्रगती करण्यासाठी संयम आणि अनुभवातून शिकणे अधिक महत्त्वाचे आहे.

आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी रेल्वे स्थानकांवर लावलेल्या एका चेतावणीचे उदाहरणही दिले. ते म्हणाले, “शॉर्टकट तुम्हाला अडचणीत आणेल,” याचा अर्थ असा की, चुकीचा शॉर्टकट घेतल्यास मार्ग सोपा होण्याऐवजी व्यक्तीचे नुकसान होऊ शकते”. त्यांचा संदेश होता की, “झटपट यशाच्या मागे लागण्याऐवजी तरुणांनी असे मार्ग निवडावेत जे दीर्घकाळात एक मजबूत पाया प्रदान करतील.”

हेही वाचा –  मराठी शिकावचं लागणार, अन्यथा चालकांचा परवाना होणार रद्द, शासन निर्णय येणार

पंतप्रधानांनी तरुणांना त्यांच्या आवडीच्या यशस्वी व्यक्तींची चरित्रे वाचण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, पुस्तके एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील संघर्ष, अनुभव आणि घेतलेले निर्णय समजून घेण्यास मदत करू शकतात. पंतप्रधान मोदी म्हणाले की, इतरांच्या अनुभवातून शिकल्याने जीवनातील अनेक चुका टाळण्याचा मार्गही दिसतो.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदींनी रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळातील आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयीचे किस्सेही सांगितले. ते म्हणाले की, कोविंद यांनी पदावर असताना एक आदर्श घालून दिला. पद सोडल्यानंतरही ते देशाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर काम करत आहेत आणि ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ संबंधित समितीचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मूळ गावी, परौंखला भेट दिल्याचा उल्लेखही केला. ते म्हणाले की, राष्ट्रपती झाल्यावर कोविंद जेव्हा त्यांच्या गावात आले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम आपल्या शिक्षकांच्या चरणांना स्पर्श केला, गावाच्या मातीला वंदन केले आणि तेथील लोकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

हा भावनिक आणि विनम्र हावभाव संपूर्ण देशाने पाहिला होता. पंतप्रधान म्हणाले की, रामनाथ कोविंद यांच्या या कृतीने जगाला भारताच्या सुसंस्कृत परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांची एक झलक दाखवली, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button