Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अशी अतिवृष्टी कधी पाहिली नव्हती; शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता

Sharad Pawar | मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत सध्या अतिवृष्टीने थैमान घातले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घराघरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले असून, शेतकऱ्यांना शेतीतील पिकांसह माती वाहून जाण्याच्या दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

शरद पवार म्हणाले, की दुष्काळासाठी प्रसिद्ध आणि जिथे पाऊस-पाण्याची कमतरता असते अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्यांच्या संसारांवर झालेला आहे. साधारणपणे या महिन्यांमध्ये सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. सोयाबीन हे भरवश्याचं पीक असतं. मात्र, अतिवृष्टीमुळे सोयाबीनची वाढ झाल्यानंतर पाच दिवस वाफ्यामध्ये पाणी राहिलं आणि त्यामुळे सोयाबीनसह इतर पिकं कुजून गेली. त्यामुळे, त्यापासून येणारं उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात पडलेलं नाही.

हेही वाचा       :          ‘गडकरींचा मुलगा दिवसाला १४४ कोटी रुपये कमावतोय’; अंजली दमानिया यांचा नितीन गडकरींवर निशाणा

आपण दुष्काळ पाहिला. पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. नेहमी कमी पाऊस असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृ्ष्टी होत आहे. त्यात सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची असते. केंद्राकडे नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन राज्य सरकारने वेगाने पंचनामे करणं व नुकसानभरपाई देणं या दोन गोष्टी तातडीने करणं आवश्यक आहे असं शरद पवार म्हणाले.

पीक वाहून गेलं तर त्या वर्षीचं नुकसान होतं. पण जमीन वाहून गेली, तर त्या जमिनीची उत्पादकता कायमची कमी होते. त्यामुळे फक्त पिकांसाठी मदत करून चालणार नाही, जमिनीसाठीही मदत करावी लागेल. रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, अनेक ठिकाणी गुरं वाहून गेली. त्यामुळे शेतीसाठी समस्या निर्माण होतील. या सर्व गोष्टींकडे बघण्याची गरज आहे. हे काम राज्य सरकारला गतीनं करावं लागेल, असं शरद पवारांनी सांगितलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button