स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात दिसला देशभक्तीचा रंग
शिक्षण विश्व: कासारवाडी परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड | देशभरात अभिमानाने आणि उत्साहाने साजरा होत असताना, कासारवाडी परिसरातील विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जवळकर यांनी उर्दू स्कूल, सिद्धी विनायक मंदिर, डी एम के इंटरनॅशनल स्कूल, विकास शील सोसायटी, तसेच ज्येष्ठ नागरिक संघ, कासारवाडी येथे ध्वजारोहण समारंभाला उपस्थित राहून तिरंग्याला अभिमानाने वंदन केले.
हेही वाचा : लाडकी बहीणनंतर आता “लाडकी सून” अभियान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
या वेळी विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येक ठिकाणी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन, देशभक्तिपर गीतांची गाणी आणि विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण भाषणांनी वातावरण भारावून गेले होते. यावेळी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना आदरांजली वाहून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेणे आणि देशासाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान देणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. आजचा दिवस देशभक्तीच्या रंगांनी आणि आनंदाच्या उत्साहाने भारलेला आहे.
– प्रतिभा जवळकर, सामाजिक कार्यकर्त्या.




