शॉर्टसर्किटमुळे पुणे-दौंड प्रवासी गाडीत आग; प्रवाशाचा थोडक्यात जीव वाचला
रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ : प्रवाशाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

पुणे | पुण्याहून दौंडकडे जाणाऱ्या डिझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (DEMU) प्रवासी गाडीत सोमवारी भीषण आग लागण्याची घटना घडली. ही आग शौचालयात शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या आगीत एक प्रवासी शौचालयात अडकला होता. दरवाजा लॉक झाल्यामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता. त्याच्या आरडाओरडीनंतर आणि धूर नजरेस पडताच, जागरूक प्रवाशांनी तत्काळ धाव घेतली आणि दरवाजा तोडून त्याला सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या सतर्कतेमुळे एक जीव वाचवण्यात यश आले.

हेही वाचा : कुंडमळा पूल प्रकरणी पालकमंत्री अजितदादा गप्प का? संजय राऊतांचा सवाल
दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीला छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये उभ्या असलेल्या एका रिकाम्या प्रवासी गाडीच्या वातानुकूलित डब्यात देखील आग लागली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. घटनेनंतर रेल्वे स्थानक व अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि साधारणतः ३० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या. ही आग इतकी तीव्र होती की एक संपूर्ण डबा जळून खाक झाला आणि आगीचा धूर दूरवरून दिसत होता.





