एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! लालपरीचं LIVE लोकेशन मोबाईलवर कळणार

MSRTC ST Bus | सर्वसामान्य नागरिक लालपरीने प्रवास करण्यावर अधिक भर देत असतात. मात्र आता या नागरिकांसाठी परिवहन महामंडळाने एक मोठी गुड न्यूज दिली आहे. आता एसटी बस कुठंपर्यंत आली आहे, हे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर बघता येणार आहे.
एसटीच्या प्रवाशांनी काढलेल्या तिकिटावर असलेला ट्रिप कोड एसटीच्या अॅप्लिकेशनमध्ये ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचे लोकेशन समजणार आहे. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ, त्या सर्व गाड्यांचे थांबे हे देखील समजणार आहेत.
हेही वाचा – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची एकुण संपत्ती किती? वाचा सविस्तर..
एसटी महामंडळाने तयार केलेल्या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचे लाईव्ह लोकेशन मोबाइलवर कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टॅन्डवर येण्याची वेळ आता मोबाईलवर समजणार आहे.
मात्र आता या सेवेचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. अनेकदा बस स्टँडवर येऊनही बस येण्यास विलंब होतो त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते, म्हणून आता हा निर्णय घेण्यात आला आहे.





