Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची एकुण संपत्ती किती? वाचा सविस्तर..

Arvind Kejriwal | दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदाना उतरत आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाकडे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार अरविंद केजरीवाल यांच्याकडे १.७३ कोटींची संपत्ती असून त्यांच्याकडे स्वत:चं घर किंवा गाडी नसल्याचे समोर आलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याची जंगम मालमत्ता ३,४६ लाख रुपये आहे, ज्यात २.९६ लाख रुपये बँकेत बचत म्हणून ठेवलेले आहेत. तर ५० हजार रुपये रोख आहेत. गाझियाबादमधील फ्लॅटसह त्यांची स्थावर मालमत्ता १.७ कोटी रूपयांची आहे. तसेच केजरीवाल यांनी मुदत ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा विमा पॉलिसींमध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. संपत्तीबरोबरच केजरीवाल यांनी जाहीर केलं की त्यांच्याविरुद्ध १४ गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत.

हेही वाचा    –    शिवरायांच्या नावाने आयोजित क्रीडा स्पर्धांना १ कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

पत्नी सुनीता केजरीवाल यांची संपत्ती किती?

अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल या निवृत्त सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांची संपत्ती २.५ कोटी रुपये आहे. त्याच्या जंगम मालमत्ता १ कोटींची आहे, ज्यामध्ये २५ लाख रुपये किमतीचे ३२० ग्रॅम सोने आणि ९२ हजार रुपये किमतीची चांदी आहे. सुनीता केजरीवाल यांच्या स्थावर संपत्तीमध्ये गुरूग्राममधील एक घर आहे ज्याची किंमत दीड कोटी रुपये आहे. तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न १४.१० लाख रूपये आहे, जे पती अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत माजी सरकारी अधिकारी म्हणून मिळणारी पेन्शन हा आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button