Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘आयडब्ल्यूएमएस’ प्रणालीमुळे कामाला गती

पुणे :  महापालिकेकडून शहरात दरवर्षी हजारो कोटींची विकासकामे केली जातात. मात्र, या सर्व कामांची प्रक्रिया कागदोपत्री होते. अनेकदा त्यात चुकाही होतात. ही कामे पारदर्शक होत असल्याचे पडताळण्यासाठी कोणतीही महापालिकेकडे नव्हती. त्यावर प्रशासनाने आता इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात “आयडब्ल्यूएमएस’ प्रणाली विकसित केली आहे.

निविदा प्रक्रियेपासून ते काम पूर्ण होईपर्यंत सर्व टप्प्यांवर आॅनलाइन नोंदणी आणि कामाच्या प्रगती, कामाची माहिती फोटोसह उपलब्ध असेल. मागील तीन वर्षांपासून वेगवेगळ्या विभागांत टप्प्याटप्प्याने ही प्रणाली वापरली जात आहे. त्यामुळे पालिकेच्या कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता वाढल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. या प्रणालीचे सादरीकरण या वेळी करण्यात आले.

हेही वाचा    –      महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला चहाविक्रेत्याला आमंत्रण

निविदांपासून ते थेट बिल तयार होईपर्यंतची सर्व प्रक्रिया या प्रणालीवर केली जाते. त्यासाठी प्रत्येक टप्प्यावरील अधिकाऱ्यांना “ई- सिग्नेचर’ देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ कामाची माहिती, बजेट कोड आणि मान्यतेची रक्कम संगणक प्रणालीमध्ये भरल्यानंतर कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय निविदा तयार होतात. त्यानंतर त्या स्थायी समिती व मुख्यसभेत मान्यतेसाठी पाठवून नंतर कार्यादेश दिले जातात.

तर, काम पूर्ण झाल्यानंतर त्यासाठीची आवश्यक माहिती भरल्यानंतर कामाची पडताळणी करून बिल तयार होते. त्यामुळे कामाची सर्व माहिती विभाग प्रमुखांना एका क्लिकवर मिळते. या माहितीचा एकत्रित डॅशबोर्ड असून त्याद्वारे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनाही शहरात कोणत्या विभागाची, नेमकी किती, कुठे आणि किती रकमेची कामे सुरू आहेत. किती कामे पूर्ण झालीत, किती कामांची बिले देण्यात आली आहेत अशी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button