महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला चहाविक्रेत्याला आमंत्रण

नागपुर | राज्यात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातली अनेक मान्यवर, धर्मगुरू, संत-महंत यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. दरम्यान, या शपथविधीला नागपुरातील चहाविक्रेत्यालाही आमंत्रण मिळाले आहे.गोपाळ बावनकुळे या चहाविक्रेत्याला देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आमंत्रण पाठवलं आहे.
नागपुरातील चहाविक्रेते गोपाळ बावनकुळे म्हणाले, ५ डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीसाठी मला पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी पास पाठवला आहे. मी आवर्जुन उपस्थित राहणार आहे. चहावाला म्हणून मला आमंत्रण दिलंय. आम्ही त्यांना मेसेज करतो किंवा कोणत्याही माध्यमातून त्यांची भेट घेतो तेव्हा ते आम्हाला मदत करतात.
हेही वाचा – डिसेंबर महिन्यात इतके दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
दरम्यान, भाजपाच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत फडणवीस यांची निवड होणे अपेक्षित आहे. या भैटकीनंतर बाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडेल. त्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेसाठई दावा केला जाईल. राज्यपालांकडून मंत्रिमंडळ शपथविधी समारंभ गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला असल्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती आहे.





