Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, विधिमंडळ पक्षनेतेपदी सर्वानुमते निवड

Devendra Fadnavis | राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरता केंद्रीय निरिक्षक आज मुंबईत आले. निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठरला. तर उर्वरित भाजपाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अनुमोदन दिलं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर फडणवीस आजच राज्यापालांना सत्ता स्थापनेचं पत्र देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा    –        ‘शिंदेंच्या शिवसेनेएवढी मंत्रि‍पदे आम्हाला द्या’; अजितदादांच्या राष्ट्रवादीची मागणी 

भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडल्यानंतर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. यानंतर उद्या गुरुवारी ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात नव्या मुख्यमंत्र्‍याचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या होईल, असे सांगितले जात आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत. या सोहळ्याला अमित शाह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर, धर्मगुरु, संत-महंत उपस्थित राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button