Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘उचकवण्यात शरद पवारांचा हात कोणी धरू शकत नाही’; प्रवीण दरेकर

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांना कुठलेतरी नरेटिव्ह सेट करायचे आहे. मात्र, त्यांच्या हातात काही येत नाही. त्यामुळे जीएसटीच्या माध्यमातून काही उचकवता येते का? याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. उचकवाउचकवी करण्यात शरद पवार यांचा राज्यात आणि राजकारणात कोणी हात धरू शकत नाही, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली. भाजप पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. या वेळी प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजय मयेकर, अमोल कविटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.

हेही वाचा      –      सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवार भडकले; म्हणाले..

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीत व्यापार्‍यांनी जीएसटीसंदर्भात त्यांच्याकडे केलेल्या तक्रारीवर बोलताना राज्याचे अर्थमंत्री या नात्याने अजित पवार यांना धारेवर धरले. राज्याचे अर्थमंत्री जीएसटी कौन्सिलच्या बैठकांना स्वतः उपस्थित राहत नसल्याने व्यापार्‍यांचे प्रश्न मांडले जात नाहीत. अधिकारी बैठकांना उपस्थित असतात. परंतु, बैठकांमध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार नसतो, त्यामुळे हे प्रश्न मांडले जात नाहीत, असा आरोपही पवार यांनी केला होता. यासंदर्भात प्रवीण दरेकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे दोन बैठकांना उपस्थित नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत असतात. त्या वेळी ते जीएसटी आणि व्यापार्‍यांच्या अडचणींबाबत चर्चा करत असतात.

सुप्रिया सुळे यांच्याकडे सध्या कुठलाच मुद्दा नसल्याने त्या जीएसटीबाबत फेक नरेटिव्ह तयार करत आहेत. शरद पवार हे त्यांचे ऐकून खोटे बोलत आहेत, असा आरोप दरेकर यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group