Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

माहीममध्ये महायुती अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? आशिष शेलारांचे संकेत

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे मुंबईतील माहीम मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे माहीम मतदारसंघातून दोन्ही शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माहिममध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. अशातच, भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या एका विधानामुळे ट्विस्ट येण्याची शक्यात आहे.

आशिष शेलार म्हणाले, की अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी बोलणार आहे. ते यासंदर्भात निर्णय घेतील. यात महायुतीमध्ये कोणताही मतभेद नसला तरी यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने जपता येईल असं नातं आपण दाखवलं पाहिजे. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही. ते महायुतीचे उमेदवार आहेत, महायुती म्हणून निर्णय करावा हे माझं म्हणणं आहे, असं शेलार म्हणाले.

हेही वाचा    –      बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर; जाणून घ्या संपूर्ण संघ..

दरम्यान, आशिष शेलार यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आशिष शेलार यांची भूमिका ही भारतीय जनता पक्षाची असू शकते. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे चर्चा करतील. कारण हा मोठा विषय आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव हे निवडणूक लढवत आहेत. त्याबाबत काय करायचं?याचा निर्णय हे महायुतीचे नेते चर्चा करून घेतील. त्याबाबत मी बोलणं योग्य नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button