Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा टोकियोत

पुणे :  आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने आणि अखिल जपान भारतीय महासंघ आणि एदोगावा इंडिया कल्चर सेंटर, टोक्यो यांच्या सहकार्याने टोकियो शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे.

जानेवारी महिनाअखेरीस स्मारकाचे भूमिपूजन होणार असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २०२५ मध्ये त्याचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.जपान येथील शिवाजी महाराज स्मारकाचे समन्वयक शशिकांत कांबळे, आम्ही पुणेकर संस्थचे विश्वस्त अखिल झांजले, अ‍ॅड. मिलिंद पवार, अभयराज शिरोळे, श्याम दौंडकर, शिल्पकार विवेक खटावकर, उत्तम मांढरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

हेही वाचा    –        अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार का? संजय राऊतांचं सूचक विधान

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांना प्रास्ताविक नामांकन मिळालेले आहे. साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि तामिळनाडू येथील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा समावेश वारसा स्थळांच्या यादीत आहे. याचा प्रसार आणि प्रचार करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.मागील वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने उभारण्यात आला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुधीर मुनगंटीवार, राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचे प्रेरणा देणारे स्मारक टोकियो येथे अभिमानाने उभे राहणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील अकरा गड- किल्ल्यांची माती आणि पाणी टोकयोमध्ये नेण्यात येणार आहे. या पुतळ्याची निर्मिती पुण्यातील विवेक खटावकर यांचे चिरंजीव विपुल आणि विराज हे दोघे करणार आहेत.

खटावकर यांची तिसरी पिढी शिल्पाचे काम करत आहे. अखिल जपान भारतीय महासंघाचे अध्यक्ष आणि एदोगावा इंडिया कल्चर सेंटर, टोक्योचे संचालक योगेंद्र पुराणिक यांचे स्मारकासाठी सहकार्य मिळाले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button