ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पैशांची उधळण करणारे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत पत्र

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मृतींची साठवण असलेल्या ठाण्यात आनंद आश्रमातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद आश्रमात नोटा उधळल्याचं समोर आलं आहे. यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता पैशांची उधळण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत पत्र लिहिलं आहे.

पत्र जसंच्या तसं
प्रति,

नितीन पाटोळे

12 सप्टेंबर 2024 रोजी गणपती विसर्जनाच्या रात्री आपल्याकडून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आश्रमामध्ये जे कृत्य घडलं. ते अतिशय निंदनीय असून त्यामुळे आपल्या पक्षावर चौफेर बाजूने टीका होत आहे. सदर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. तरी या कारणास्तव आपल्याला पदावरून काढून टाकण्यात येत आहे. तरी सदर घडलेल्या प्रकाराबद्दल दोन दिवसात खुलासा करावा.

आपला स्नेहांकीत नरेश गणपत म्हस्के

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group