काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंना भाजपकडून ऑफर

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ट नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला व प्रणिती शिंदेला दोन वेळा भाजपाची ऑफर मिळाली असल्याचं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, भाजपाचे काही नेते मला आणि प्रणितीला भाजपामध्ये या म्हणून सांगत होते. पण ते कसं शक्य आहे. ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो, जिथे आमचे बालपण गेले, जिथे आम्ही वाढलो. आता मी ८३ वर्षांचा झालो, आता कसं दुसऱ्याशी घरोबा करणार? हे शक्य नाही. प्रणितीबद्दल तुम्हाला माहितीच आहे, ती पक्ष बदलण्याच्या भानगडीत पडणार नाही.
हेही वाचा – धक्कादायक! मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या जेवणात सापडला मेलेला उंदीर
कार्यकर्त्यांशी बोलत असताना शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला. भाजपाकडून मला आणि प्रणिती शिंदेला दोन वेळा ऑफर दिली गेली. माझा दोन वेळा पराभव होऊनही मला ऑफर दिली जाते. माझे संपुर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मी हा निर्णय कसा काय घेऊ शकतो, असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.




